ड्रेंचिंग म्हणजे काय? ते कसं करतात?
कसे आहात मित्रांनो?
आज आपण शेतीत कामी येणारी एक महत्वपूर्ण प्रक्रिया – ड्रेंचिंग – कशी होते ते पाहणार आहोत.
ड्रेंचिंग चा साधा आणि सरळ अर्थ आहे – कोणताही पातळ पदार्थ रोपांच्या मुळापर्यंत पोचवणे. मग तो पातळ पदार्थ नाइट्रोजन बायोफर्टिलाइजर, ऑर्गैनिक पेस्टिसाइ, या ऑर्गैनिक फंगीसाइड, यापैकी कोणताही असू शकूतो. याची प्रक्रिया नीट समजून घेऊ या, म्हणजे शेती करत असताना कधीही ड्रेंचिंग करायचं असेल, तर आपल्याला ते कसं करायचं हे निश्चितपणे माहीत असेल.
रोपांना पाणी देण्यासाठी जे स्प्रे टैंक आपण वापरतो – जे साधारणतः 20 लीटर चं असतं – ते साबणने स्वच्छ धूवून घ्यायचं म्हणजे याआधी त्यात घेतलेल्या कुठल्याही रासायनिक पदार्थाचे कण त्यात राहू नये. त्यानंतर एक लीटर च्या बाटलीतला तो पातळ पदार्थ पाण्यांत मिसळून या 20 लीटरच्या स्प्रे टैंक मध्ये भरायचा. यानंतर टैंकचं नोझल म्हणजे तोटीचं टोक काढून ते पदार्थ मिसळलेलं पाणी सरल रोपांच्या मुळांना घालायचं.
या पद्धतीने ड्रेंचिंग केल्याने मुळांना मिळणारा पदार्थ जर नाइट्रोजन बायोफर्टिलाइजर (जसं बायोएनपीके) असेल, तर रोपांना पुरेसं पोषण तत्व मिळेल, जर पेस्टिसाइड किंवा फंगीसाइड असेल तर ते रोपांची रोग-प्रतिरोधक क्षमता वाढवेल, आणि पीक कीटक किंवा रोगांपासून सुरक्षित राहील. यामुळे आपल्याला स्वस्थ पीक मिळेल, ज्याची गुणवत्ता पण चांगली असेल.
आता बघूया ड्रेंचिंग करायचं कधी?
ड्रेंचिंग करण्याची सगळ्यात चांगली वेळ असते पेरणीच्या 25-30 दिवसांनंतर पहिल्या सिंचनाच्या वेळी. यावेळी रोपं लहान असतात, त्यांची ऊंची 1 ते 2 फीट असते, त्यामुळे आपण त्यांची मुळं नीट पाहू शकतो. अशावेळी आपण त्यांच्या मुळापर्यंत पोषक किंवा संरक्षक पदार्थ नीट पोचवू शकतो. रोपं थोडी मोठी झाल्यावर आपण ड्रेंचिंग केलं तर ते त्यांच्या मुळापर्यंत पोचू शकणार नाही. ते बाहेरच रोपांच्या मुळांवर किंवा पानांवर पडून राहील, आणि रोपांना त्याचा फारसा फायदा होणार नाही.
मित्रांनो, #यूनिकिसान चे हे ब्लॉग्स शेती शी संबंधित महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सतत आणताहेत. त्यामुळे यूनिकिसान ऐप डाउनलोड करून त्याद्वारे आमच्या संपर्कात रहा आणि शेती शी संबंधित कुठलीही सेवा पूर्णपणे मोफत मिळवा.
Comments
Post a Comment