आर्गेनिक पेस्टीसाइड्स चे महत्व
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण या आधीच्या ब्लॉगमध्ये ऑर्गेनिक पेस्टीसाइड्स कसे पिकांना सुरक्षित ठेवतात आणि मातीला ही सुपीक बनवणारे सूक्ष्म जीव तयार करतात हे पहिलं.
बऱ्याच प्रकारचे कीटक, जसे – एग्स eggs (एग्स), larvae (लार्वे), beatle (बीटल), worms (इल्ली), white grubs (व्हाइट ग्रब), nimple (निमपल), termites (टरमाइट), pests (पेस्ट), caterpillars (कैटरपिलर), aphids (अफीड), white flies (व्हाइट फ्लाय), इत्यादि – पिकांवर आक्रमण करत असतात. ऑर्गेनिक पेस्टीसाइड्स रोपांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात, आणि पेस्ट ने लागणाऱ्या रोगांशी लढण्याची शक्ति देतात. यांचा नेमक्या वेळेवर आणि नेमक्या प्रमाणात वापर केला, कुठलंही केमिकल पेस्टीसाइड्सच्या मदतीशिवाय पिकांना आणि मातीला सशक्त आणि सुपीक बनवता येतं.
तर मित्रांनो, बाजारात मुख्यतः 3 प्रकारचे ऑर्गेनिक पेस्टीसाइड्स मिळतात.
Metarhizium anisopliae (मेटारिज़ीअम अनिसोप्ले)
Beauveria Bassiana (बौवरिया बसिआना)
Verticillium (वर्टीसिलियम)
हे तीनही पेस्टीसाइड्स पातळ स्वरूपात एक एक लीटर बाटल्यांमध्ये मिळतात. यातले कोणते पेस्टीसाइड्स कोणकोणत्या पिकांसाठी कामाचे आहेत ते आपण आज पाहणार आहोत. हे ऑर्गेनिक पेस्टीसाइड्स वापरण्याची पद्धत तीच असेल जी आर्गेनिक फंगिसाइड्स वापरताना आपण पहिली – पेरणीच्या वेळी आर्गेनिक मैन्यूअर मध्ये मिसळून जमिनीत टाकायचं, मग पहिल्यां सिंचनाच्या वेळी ड्रेंचिंग करायचं, म्हणजे पाण्यांत मिसळून ते रोपांच्या मुळांना घालायचं, आणि क्रॉप मेंटेनेंस मध्ये फोलियर स्प्रे म्हणजे वाढत्या पिकाला दर 25 से 30 दिवसांत शिडकाव करायचा. याने रोपांवर होणारं पेस्ट चं आक्रमण थांबवता येईल, आणि पीक निरोगी व सशक्त होईल.
हे तीनही ऑर्गेनिक पेस्टीसाइड्स आपण जर एकत्र वापरले तर याचा खूपच चांगला प्रभाव आपल्याला दिसेल. किटकांपासून होणारा कोणताही रोग पिकांच्या जवळपासही फिरकणार नाही.
आणि जर हे आपल्याला वेगवेगळे वापरायचे असतील, तर कोणत्या पिकावर कोणत्या प्रकारचे रोग लागतात, हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे त्यांवर यापैकी कोणतं ऑर्गेनिक पेस्टीसाइड वापरायचं ते ठरवता येईल.
यातलं मेटारिज़ीअम अनिसोप्ले नावाचं ऑर्गेनिक पेस्टीसाइड उस, कापुस, मका, भुईमूग, सोयाबीन, तांदूळ, बटाटा आणि इतर भाज्यांच्या शेतीमध्ये खूपच प्रभावी ठरलंय. हे मुख्यतः eggs (एग्स), larvae (लार्वे), beatle (बीटल), worms (इल्ली), white grubs (व्हाइट ग्रब), nimple (निमपल), termites (टरमाइट), इत्यादि, किटकांमुळे येणारे रोग रोपांना लागू देत नाही.
बौवरिया बसिआना हे ऑर्गेनिक पेस्टीसाइड सगळ्यात जास्त प्रचलित आहे. आणि बऱ्याच दुकांनामध्ये मिळतं. याचा वापर मुख्यतः ‘pulses आणि cereals’ म्हणजे डाळी आणि धान्याच्या पिकांसाठी करावा. हे पिकांना caterpillars म्हणजे अळयांपासून वाचवते. त्याचप्रमाणे, इतर हानिकारक पेस्ट्स पासून रोपांचं रक्षण करते, जसे – white flies (व्हाइट फ्लाय), beatle (बीटल), locusts (लोकस्ट), aphids (अफीड), इत्यादि.
तीसरं ऑर्गेनिक पेस्टीसाइड, वर्टीसिलियम, फळांच्या शेतीत पिकांना सुरक्षित ठेवण्यात प्रभावी ठरतं. हे कुठल्याही प्रकारच्या फळांच्या शेतीसाठी वापरता येऊ शकतं.
मित्रांनो, तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे कामात येतात हे आम्हाला खाली कॉमेंट्स करून सांगत चला. आणखी काही शंका असतील तर त्याही विचारा. सोबतच #Unikisan App डाउनलोड करायला विसरू नका. म्हणजे ही माहिती तुम्हाला कधीही, कुठेही बघता येईल.
Comments
Post a Comment