बायो ज़ाइम कायआहे? त्याचं महत्व काय आहे?

कसेआहात माझ्या शेतकरी बंधूंनो? आज मी तुम्हाला शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे. आणि तो उपाय आहे बायो ज़ाइम.

भारतातले काही मूठभर शेतकरी हे वापरताहेत आणि त्यांना चांगलं पीकही मिळतय. पण जास्तीत जास्त शेतकर्‍यांना बायो ज़ाइम माहीतच नाही. 

बायो ज़ाइम मध्ये ह्यूमिक एसिड, एमिनो एसिड, फुल्विक एसिड, सी वीड्स म्हणजे समुद्री शैवल असे सगळे तत्त्व असतात. हे दाणेदार आणि पातळ दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. 

तर मित्रांनो, याचा  वापर कसा करायचा हे समजून घेऊ या. कारण उत्पादन वाढवण्यासाठी हे खूपच कामाचं आहे. 

याचा वापर पेरणीनंतर पाहिल्या सिंचनाच्या वेळी करावा. यावेळी बहुतेक शेतकरी शेतात यूरिया टाकतात. केवळ यूरिया न टाकता 50% यूरिया आणि बायोज़ाइम घ्यायचंय. हे मिश्रण पहिल्या सिंचनाच्या वेळी शेतात टाकल्याने पिकांवर उत्तम प्रभाव दिसेल. यातलं यूरिया हे रोपांना नाइट्रोजन देतं ज्यामुळे तसंच पीक चांगलं होतं. बायो ज़ाइम ह्याला आणखी गति देतं. त्यासोबतच हे मल्टीपल सीडलिंग बनवतं, म्हणजे पेरलेल्या बियांच्या अनेक बिया बनवतं. आणि ह्यामुळेच पीक भरपूर येतं. 

बायोज़ाइम चा वापर एका सिंचन चक्रात एकदाच करावा. याचा डोज़ 4-5 किलो प्रति एकर असा असावा. इतकं बायोज़ाइम 50% यूरियात मिसळून शेतात टाकायचंय. आता, हा उपाय झाला ज्या शेतकऱ्यांना सेमी-आर्गेनिक फार्मिंग करायची आहे त्यांच्यासाठी. 

परंतु जे शेतकरी 100% आर्गेनिक फार्मिंग करू इच्छितात  त्यांच्यासाठी काय उपाय आहे पाहुया. 

ऑर्गेनिक मैन्युअर चं एक 50 किलो चं पोतं घ्या. त्यात 4-5 किलो बायोज़ाइम मिसळून, ते शेतात पाहिल्या सिंचनाच्या वेळी सारख्या प्रमाणात पसरवून टाकायचे. ही वेळ असते पेरणीच्या  साधारण पणे 25 ते 30 दिवसां नंतरची. हेसुद्धा एका चक्रात एकदाच टाकायचं आहे.

वर सांगितल्याप्रमाणे बायोज़ाइम हे पातळ स्वरुपात पण मिळतं. तर एक लिटर बायोज़ाइम प्रति एकर डोज़ 15-20 लीटर पाण्यात मिसळून त्याने रोपांची ड्रेंचिंग करायची आहे.

बायो ज़ाइम वापरा, त्याचा प्रभाव बघा, उत्तम पीक काढा, आम्हालाही खाली कमेन्ट करून सांगा, म्हणजे आमच्या इतर शेतकरी बांधवांनाही प्रेरणा मिळेल. 

आणि ही सगळी माहिती तुमच्या लक्षात राहणार नसेल तरी हरकत नाही, तुम्ही ही माहिती यूनिकिसान एप वर कधीही पाहू शकता.


Comments

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?