ऑर्गेनिक फंगीसाइड्स (बुरशी-नाशक) चे महत्व

कसे आहात शेतकरी मित्रांनो?

आज आपण बोलणार आहोत ऑर्गेनिक फंगीसाइड्स बद्दल. ऑर्गेनिक फंगीसाइड्सचा उपयोग होतो पिकांचं फंगस म्हणजे बुरशिजन्य रोगांपासून रक्षण करण्यासाठी. ते सुद्धा कुठलंही रासायनिक फंगीसाइड न वापरता.

कसं ते बघूया.  

बाजारात 2 प्रकारचे ऑर्गेनिक फंगीसाइड्स सहज उपलब्ध आहेत. 

एक आहे  – ट्राईकोडर्मा, आणि 

दूसरा – स्यूडोमोनास फ्लोरेसेंस.


यातल्या ट्राईकोडर्मा नावाच्या ऑर्गेनिक फंगीसाइडचा मुख्यतः वापर होतो पेरणीच्या वेळी, आणि नंतर सिंचनाच्या वेळी. आणि स्यूडोमोनास फ्लोरेसेंस हे ऑर्गेनिक फंगीसाइड क्रॉप मेनटेनेंस साठी कामात येतं, म्हणजे वाढत जाणाऱ्या पिकाच्या सुरक्षेसाठी. 

हे दोन्ही फंगीसाइड्स एक एक लीटर च्या बाटलीत मिळतात. हे पातळ आणि पावडर म्हणजे भुकटीच्या रूपात पण उपलब्ध आहेत. त्यायतला पातळ फंगीसाइडचा प्रभाव जास्त महणून तो आपल्या जास्त सोयीचा आहे. यांचा एक लीटरचा डोज़ एक एकर जमीनीसाठी पुरेसा आहे. 

आता यांचा वापर कसा करायचा ते समजून घेऊ या. 

आपल्यापैकी कितीतरी शेतकरी आपल्या शेतात रासायनिक फंगीसाइड्स टाकतात. आपल्याला जर रासायनिकच्या ऐवजी ऑर्गेनिक फंगीसाइड टाकायची सुरवात करयची असेल तर, आधी आपल्याला रोपांची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

यासाठी एक लीटर ट्राईकोडर्मा ऑर्गेनिक मैन्युअरमध्ये मिसळून पेरणीच्या वेळी जमिनिला द्यायचा. किंवा याने सीड ट्रीटमेंट करायची. यामुळे पेरलेल्या बियांचं कुठल्याही बुरशिजन्य रोगां पासून बचाव होईल. 

त्यानंतर, पुढे पहिल्या सिंचनाच्या वेळी आणखी एक लीटर ट्राईकोडर्मा घेऊन, आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे. आता ड्रेंचिंग कसं करायचं हे आम्ही तुम्हाला आधी सांगितलंच आहे.

तर, एक लीटर ट्राईकोडर्मा घेऊन ते 15-20 लीटर पाण्यात मिसळून, स्प्रे टैंक ने ड्रेंचिंग करायचं आहे, म्हणजेच अंकुरित होणार्‍या रोपांच्या मुळांचं सिंचन करायचं आहे. एक एकरासाठी जर चार स्प्रे टैंक लागत असतील, तर एक लीटर ट्राईकोडर्मा चार स्प्रे टैंकांमध्ये सारख्या प्रमाणात वाटून घ्या, आणि त्याने ड्रेंचिंग करा, म्हणजेच ते मिश्रण मुळांना घाला.

ऑर्गेनिक फंगीसाइड ने ड्रेंचिंग करताना लक्षात ठेवा की ते शेतात यूरिया टाकायच्या कमित कमी 48 तासांपूर्वी किंवा 48 तासांनंतर करायचंय.

याच बरोबर, आपल्याला क्रॉप मेन्टेनेंस पण करायचं आहे. क्रॉप मेन्टेनेंस म्हणजे नियमितपणे पिकांचं रक्षण करणाऱ्या फंगाइसाइड चा शिड़काव करत राहणे. यासाठी ‘स्यूडोमोनास फ्लोरेसेंस’ नावाचं ऑर्गेनिक फंगीसाइड पाण्यात मिसळून् दर 25-30 दिवसांत आपल्याला शेतात त्याचा शिडकाव करायचा आहे. यालाच आपण 'फोलियर स्प्रे' असंही म्हणतो. 

याप्रमाणे, पेरणी पासून तर पीक पूर्ण तयार होतपर्यंत, रासायनिक फंगीसाइड न वापरता, ऑर्गेनिक पद्धतीने पिकांना बुरशीच्या आक्रमणा पासून सुरक्षित ठेवू शकतो.

मित्रांनो, तुम्ही जर या लहान लहान गोष्टीं लक्षात ठेवल्या तर तुमच्या पिकांची गुणवत्ता वाढत जाईल, आणि जमीन सशक्त होत जाईल. अशाच आणखी शेतीशी संबंधित उपयोगी माहितीसाठी #Unikisan ब्लॉग फॉलो करत रहा. आजच Unikisan ऐप सुद्धा डाउनलोड करा. म्हणजे तुम्ही शेतात किंवा घेरी, कुठेही असले तरी ही माहिती तुम्हाला सहज उपलब्ध राहील. 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?