पिकांना निमातोड़ रोगापासून कसं वाचवाल?

 कसे आहात शेतकरी बंधूंनो?

आज आपण बोलूया निमातोड बद्दल. हा एक असा रोग आहे जो रोपांच्या मुळांना अशक्त करतो. एक विशिष्ट प्रकार ची अळी असते जी मातीत रोग पसरवते, आणि अश्या मातीत जेव्हा पेरणी होते, तेव्हा हा रोग रोपांच्या मुळांना ही लागतो; यामुळे मुळांवर लहान लहान गाठी दिसू लागतात, त्यांनाच निमातोड म्हणतात. हा रोग मुळांनाच लागल्याने रोपांचा विकास होऊ शकत नाही. रोपं पिवळे पडतात. आणि अश्या रीतीने पूर्ण पीक नष्ट होतं. 

निमातोड ची ही समस्या सगळ्याच प्रदेशांमध्ये नसली तरी भारतात बऱ्याच ठिकाणी निमातोड मुळे शेतकरी त्रस्त आहेत. 

मित्रांनो, निमातोड वर समाधान आहे. पण तो आपल्या शेतीत होऊच दिला नाही तर? पाहूया निमातोड आधीच कसा रोखायचा. आणि तेही पूर्णपणे आर्गेनिक पद्धतीने. कोणतंही केमिकल किंवा केमिकल पेस्टिसाइड न वापरता. 

मित्रांनो, बाजारात एक प्रभावी औषध मिळतं - पेसिलोमाइसीज़ लिलासिनस (Paecilomyces Lilacinus). हा ऑर्गेनिक पेस्टिसाइड चा प्रकार आहे. हा एक लीटरच्या बाटलीत मिळतो आणि हा आतापर्यंत खूपच फायद्याचा ठरला आहे. 

आता, एक लीटर पेसिलोमाइसीज़ लाइलैसिनस घ्या, ते ऑर्गेनिक मैन्युअर मध्ये मिसळून, ते पेरणीच्या वेळी शेतात टाका. पुढे, रोपं थोडी वाढल्यावर, पहिल्या सिंचनाच्या वेळी, पेसिलोमाइसीज़ लिलासिनस टाकून रोपांच्या मुळांना ड्रेंचिंग करा. हे जर आपण नीट केलं, तर ऑर्गेनिक पद्धतीने आपण निमातोड या रोगापासून रोपांना सुरक्षित ठेवू शकतो. 

अशा पद्धतीने पेसिलोमाइसीज़ लिलासिनस या ऑर्गेनिक पेस्टिसाइडचा वापर करून आपण निमातोड पासरण्यापासून रोखू शकतो. यामुळे आपल्या शेतातलं पीक स्वस्थ आणि सशक्त राहील. 

मित्रांनो, #यूनिकिसान चे हे ब्लॉग्स शेतीशी संबंधित महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सतत आणताहेत. त्यामुळे यूनिकिसान ऐप डाउनलोड करून त्याद्वारे आमच्या संपर्कात रहा आणि शेतीशी संबंधित कुठलीही सेवा पूर्णपणे मोफत मिळवा. 


Comments

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?