शेतात ताणांची वाढ आर्गेनिक पद्धतीने अशी थांबवा
नमस्कार मित्रांनो,
आजचा आपला विषय जरा नाजूक आहे. आपण चर्चा करणार आहोत शेतात कुठलाही केमिकल न वापरता, म्हणजेच ओर्गॅनिक पद्धतीने, तणांची वाढ कशी थांबवता येईल.
नाजूक यासाठी की याविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. आमच्या टीमने संशोधन करून ही मोलाची माहिती मिळवली आहे, जी आपण आज बघणार आहोत. त्यामुळे ही माहिती नवीत विचारसारणीच्या शेतकर्यांच्या जास्त उपयोगाची आहे, जे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने, कोणतेही केमिकल्स न वापरता, ओर्गॅनिक फार्मिंग करण्याचं स्वप्न बाळगतात.
तण, किंवा वीड, हे एक प्रकारचं अनावश्यक गवत आहे जे शेतातील रोपट्यांच्या आजू-बाजूला वाढतं आणि रोपाची वाढ रोकते. यामुळे आपल्या शेताचं जवळजवळ 30% उत्पादन कमी होतं. अनेक प्रदेशांमध्ये शेतकरी या अशा तणांमुळे नुकसान झेलतात. म्हणून तणांवर एक जलिम उपाय करणं तुमच्या पिकांच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
अनेक शेतकरी पिकांना तणापासून वाचवण्यासाठी हर्बिसाइड रासायनिक वापरतात. तुम्ही पण हर्बिसाइड वापरत असाल तर त्याचा वापर सध्या कमीत कमी करा. कारण आम्ही तुम्हाला याचा आर्गेनिक पर्याय सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हाला हर्बिसाइडची ची गरजच राहणार नाही.
सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे तुमच्या शेतात ठिबक सिंचन सुरू करा. यात जिथे पाण्याची गरज आहे, म्हणजे जिथे रोप आहे, तिथेच पाणी पोचतं. जिथे जिथे रोपं नसतील त्या जमीनीवर पाणी पडत नाही, आणि तण वाढण्याची शक्यता कमी होत जाते. त्यामुळे शक्य असल्यास लवकरात लवकर आपल्या शेतात ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन सुरू करा.
दुसरा उपाय आहे मल्चिंग. यात एक प्लास्टिकचं कापड जमिनीवर अंथरलं जातं. त्यात एक भोक असतं, ज्यातून वाढणारं रोप बाहेर येऊ शकतं. मिळणारं पाणी आणि उन त्या भोकामुळे केवळ त्या रोपाला आणि त्याच्या मूळाला मिळतं. रोपाच्या भोवतीच्या जमिनीला उन-पाणी मिळत नाही आणि तण वाढत नाही. ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. यात मजूरांचा खर्चही कमी होतो. भारतात काही शेतकरी मल्चिंग करताहेत आणि त्यांनी यशस्वीपणे शेतातले तण कमी सुद्धा केले आहे. इतर शेतकरी सरळ हर्बिसायड वापरतात.
बाजारात हे प्लास्टिक मल्च-शीट मिळतात. जे शेतातल्या पूर्ण जमिनीवर अंथरायचे. त्यात जिथे जिथे भोकं असतील त्यातून पेरणी करायची; त्यातूनच रोपटी पण बाहेर येतात आणि मोठी होतात. मल्चिंग चा खर्च 3,000-5,000 रुपये प्रति एकर एवढा येतो.
आपण मल्चिंग आणि ड्रिप इरिगेशन एकत्र सुद्धा करू शकतो. खरंतर ते जास्त प्रभावी आहे. शक्य असल्यास तुम्ही हा प्रयोग करू शकता.
पुढचा उपाय आहे पराळी – म्हणजे धानाच्या आणि इतर पिकांच्या शेतीतून निघणारं अवशेष. बहुतेक शेतकरी हे पराळी जाळून टाकतात. परंतु जाळून टाकण्याऐवजी हे पराळी रोपांच्या भोवतालच्या मातीवर पसरवले तर तण उगवणार नाहीत. तण उगवण्यासाठी जागाच राहणार नाही आणि आपोआपच तणांवर रोक लागेल. अशा पद्धतीने पराळी जाळून प्रदूषण करण्यापेक्षा त्याचा चांगलं उपयोग होईल आणि तण रोखण्यासाठी वेगळा खर्चही करावा लागणार नाही.
आणखी एक उपाय आहे तण रोखण्याचा, तो म्हणजे वीड-कटर मशीन. जे बाजारात 10,000 रुपयांची मिळते. ही तुम्ही ऑनलाइन पण शकता. याने तुम्ही वेळोवेळी तण कापत राहिलात तर रोपं सुरक्षित राहतील, स्वस्थ राहतील आणि तुम्हाला उत्तम पीक मिळेल.
ज्या शेतकरी बंधूंना आपल्या शेतात हर्बिसाइड केमिकल चा वापर कमी करायचा आहे त्यांनी हे उपाय नक्की करावे.
तर मित्रांनो, आमच्या संपर्कात रहा. कारण शेतीतले असे अनेक उपाय आम्ही सांगत राहणार अहोत. सोबतच युनिकिसान एप्प डाउनलोड करा, म्हणजे तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला ही माहिती सहज उपलब्ध होत राहील.
Comments
Post a Comment