पातळ बायोफर्टिलाइज़र्स मध्ये सीएफयू (CFU) चे महत्व काय?
तुम्ही जे पातळ बायोफर्टिलाइज़र्स (PSB, KMB, Bio NPK, ZSB, etc) विकत घेता, त्यांचा एक सीएफयू काउंट असतो. सीएफयू (CFU) - म्हणजे कॉलनी फॉर्मिंग यूनिट. हा काउंट लेबल वर लिहिलेलं असतो.
सीएफयू (CFU) काउंट चा साधा अर्थ म्हणजे पातळ बायोफर्टिलाइज़र किती एक्टिव बैक्टीरिया निर्माण करू शकतो. हे पातळ बायोफर्टिलाइज़र प्रयोगशाळेत तयार होतात तेव्हा यात एक्टिव बैक्टीरिया असतात. पण स्टोरेज केल्यानंतर यातले काही बैक्टीरिया मरतात, आणि ते कामाचे राहत नाही. पण यातले जे बैक्टीरिया एक्टिव म्हणजे जीवंत राहतात, ते मातीत मिसळताच आपोआप आणखी बैक्टीरिया तयार करू लागतात आणि मातीला सुपीक बनवतात.
पातळ बायोफर्टिलाइज़र घेताना लक्षात ठेवायचं आहे की त्याचा सीएफयू (CFU) सरकार द्वारा प्रमाणित मात्रेत असावा. आणि ही प्रमाणित मात्रा आहे कमीत कमी 1X108. आणि हा काऊंट पातळ बायोफर्टिलाइज़र च्या लेबल वर लिहिलेला असेल. यापेक्षा कमी सीएफयू (CFU) असेल तर जमिनीला खूप फायदा देत नाही किंवा उशिरा फायदा करतं.
तर मित्रांनो, तुम्ही पातळ बायोफर्टिलाइज़र विकत घेताना त्याच्या लेबल वर ‘एक्टिव सीएफयू (CFU) काउंट’ कमीत कमी 1X108 आहे याची खात्री करून घ्या. काही पातळ बायोफर्टिलाइज़रचा सीएफयू (CFU) यापेक्षा जास्त -- 1X109 या 1X1010 – असू शकतो. आणि तो जितका जास्त तितका तो तुमच्या जमीनिसाठी चांगला आहे.
एक्सपायरी पीरियड नंतर यातला एक्टिव बैक्टीरिया कमी होतो, आणि मग तो फारसा परिणामकारक नसतो, किंवा उशिराने परिणाम आणतो.
म्हणूनच नेहमी कमीत कमी 1X108 सीएफयू (CFU) चा पातळ बायोफर्टिलाइज़र विकत घ्या, आणि त्याचा वापर एक्सपायरी पीरियडच्या आतच करा.
मित्रांनो आमची ही सगळी माहिती तुमची कामात येतेय अशी आशा करतो, आणि ती कामात येत असेल तर आज यूनिकिसान ऐप्प डाउनलोड करा, म्हणजे ही सगळी माहिती तुम्हाला 24 तास मिळू शकेल, केव्हाही आणि कुठेही.
Comments
Post a Comment