माइक्रोन्यूट्रिएंट फर्टीलाईज़र चे महत्व काय?

 नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो

याधीच्या ब्लॉगमध्ये आपण प्राथमिक खते (N, P, K – नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश) बद्दल चर्चा केली होती. आज आपण कॉपर, आयर्न, झिंक, आणि मँगनीज या चार प्रकारच्या सूक्ष्म द्रव्यांबद्दल बोलणार आहोत. ही सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठीही महत्त्वाची आहेत. या द्रव्यांचे प्रमाण आपल्याला सॉइल टेस्ट मधून कळते.

या पोषक घटकांची कमतरता असल्यास, पिकांच्या हिरवेपणात आणि गुणवत्तेत फरक पडतो. उदाहरणार्थ, झिंकची कमतरता असल्यास झाडाचा हिरवेपणा कमी होतो. कारण प्रकाशसंश्लेषण योग्य प्रकारे होत नाही. म्हणून, प्राथमिक घटकांसह हे दुय्यम घटक मातीत पूर्ण असणे आवश्यक आहे.

झिंक आणि लोह हे दुय्यम घटक (सूक्ष्म पोषक घटक) सॉल्यूबिलाइज़ करण्यासाठी म्हणजे विरघळण्यासाठी तुम्ही बॅक्टेरिया वापरू शकता. उदाहरणार्थ, झिंक सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया (झेडएसबी ZSB)। हे जमिनीतील अतिरिक्त झिंक सॉल्यूबिलाइज़ करून म्हणजे विरघळवून ते रोपांना देते.


दुसरं आहे थायोबॅसिलस बॅक्टेरिया, जे मातीतील अतिरिक्त लोह विरघळवून ते झाडांना देतं. थायोबॅसिलस वनस्पतींना सल्फर देखील पुरवतो ज्यामुळे पिकाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.


यांचे प्रमाण 1 लिटर प्रति एकर असावे, आणि ते आर्गेनिक मैन्यूअर मध्ये मिसळून पेरणीच्या वेळी शेतात टाकावे. कॉपर आणि मैंगनीज़ मात्र या पद्धतीने सॉल्यूबिलाइज़ करता येत नाही. या दोन घटकांची कमतरता तुम्ही ऑर्गेनिक फ़र्टिलाइज़र वापरुन पूर्ण करू शकता.

आता आपण बघू की जमिनीत ज़िंक किंवा आयरनची कमतरता असेल तर काय केलं पाहिजे. यासाठी दाणेदार सेंद्रिय खते सध्या उपलब्ध नाहीत, तर झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट या रासायनिक स्वरूपात उपलब्ध आहेत. या रासायनिक खतांचा वापर तुम्ही पेरणीच्या वेळी करू शकता. त्यांचे प्रमाण 4-5 किलो प्रति एकर असावे.

तर मित्रांनो, शेतातील मातीत या सूक्ष्म द्रव्यांचा समतोल साधण्याचा हा एक सोपा उपाय आहे. याआणि पिकाची आणि मातीची गुणवत्ता हळूहळू सुधारेल आणि उत्पादनातही वाढ होईल.

युनिकिसनच्या या माहितीचा तुम्हाला फायदा होतोय की नाही हे खाली कमेंट करून आम्हाला सांगा. फायदा होत असेल तर आम्हाला फॉलो करत रहा. आणि हो, Unikisan App डाउनलोड करा, म्हणजे ही सगळी माहिती केव्हाही आणि कुठेही तुम्हाला उपलब्ध राहील.

धन्यवाद।

Comments

  1. Thank you. We will keep publishing blogs on regular basis to benefit farming community.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?