फर्टीलाईज़र्स चा नेमका वापर करून पैसे वाचवा !

 नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो,

आपण जर अनेक वर्षांपासून आपल्या शेतात केमिकल्स (रासायनिक खत) वापरुन एकाच प्रकारची शेती करत असू, तर आपल्याला वाटतं की पीक तर आपल्याला बरं मिळतंय. पण थोडं लक्षपूर्वक पहिलं तर आपल्याला लक्षात येतं की शेतीला लागणारा खर्च हा दरवर्षी वाढतोय. 

उदहारण म्हणून, इथून दहा वर्षांपूर्वी एका एकरात आपल्याला एक एक पोतं डीएपी, एमओएपी, आणि यूरिया चे लागत असतील, तर आज त्याच ठिकाणी त्यापेक्षा जास्त केमिकल्स, म्हणजे रासायनिक खत टाकावे लागत असतील. ज्यांची जमीन सशक्त नसेल, किंवा खूप सुपीक नसेल, त्यांना तर आणखीनच जास्त केमिकल्स लागत असतील. 

केमिकल्स वपरणाऱ्या जवळ जवळ प्रत्येकच शेतकऱ्याची ही कथा आहे. खर्च दरवर्षी वाढतोय, पण पीक आणि पिकांच्या गुणवत्तेत मात्र त्या प्रमाणात वाढ होत नाहीये. 

तर मग काय करता येईल?

सगळ्यात आधी तर सॉइल टेस्ट करवून घ्या. 

सॉइल टेस्ट मध्ये हे दिसत असेल की तुमच्या जमिनीत आर्गेनिक कार्बन उत्तम आहे, तर पातळ बायोफर्टीलाईजर टाकून जमीनीत पडून राहिलेले अतिरिक्त पोषक तत्व संतुलित करा. एवढ्यानेच तुमचं खर्च बऱ्यापैकी कमी होईल. ते कसं, ते आता पाहूया. 

जर शेताच्या जमिनीत फ़ास्फ़रोस किंवा पोटाश जास्त असेल, आणि आर्गेनिक कार्बन व्यवस्थित असेल, तर पेरणीच्या वेळी आर्गेनिक मैन्युअर मध्ये पातळ बायोफर्टिलाइजर – जसे PSB, KMB, किंवा बायो-NPK – मिसळून, ते शेतात टाका. असं केल्याने तुमचा डीएपी, पोटाश, आणि यूरिया वर होणारा 40%-50% खर्च कमी होईल।

पण, जर आर्गेनिक कार्बन ची मात्रा व्यवस्थित नसेल, तर आधी आपल्या शेतातलं ऑर्गनिक कार्बन बरोबर करा, आणि मग त्यात पातळ बायोफर्टिलाइजर टाका. 

आता नुसता हा एक फरक केल्याने 40 ते 50 टक्के पैसे कसे वाचतात ते बघा. 

डीएपीच्या 50 किलो च्या एक पोत्याची किंमत असते किमान 1,400 रुपये; तसंच एमएपीच्या 50 किलो च्या एक पोत्याची किंमत असते किमान 900 रुपये. याशिवाय गोदाम आणि जास्तीचे मजूर यांचा खर्च धरा.

याच्या उलट, पातळ बायोफर्टिलाइज़र तुम्हाला येतो 500 रुपये प्रति लीटर। आर्गेनिक मैन्युअर च्या एका 50 किलो च्या बैग ची किंमत पडते 300 रूपये. खर्च अर्ध्याहून कमी झाला की नाही? यामुळे गोदाम आणि माजदूर पण जास्त लागत नाही. 

आणि यांचे आणखी फायदे बघा: तुमची लागत तर कमी झालीच; जमिनीची सुपीकता वाढली; यांशीवाय मातीतली सूक्ष्मजीव क्रिया सुधारेल; त्यामुळे भरपूर पीक येईल; पिकांची गुणवत्ता वाढत जाईल; आणि हळू हळू तुमची शेतजमीन आर्गेनिक होत जाईल. 

यामुळे तुमच्या जमिनीचे ओसी (OC), पीएच (PH), आणि ईसी (EC) पण सुधारतील. आणि हे सुधारणं किती महत्वाचं आहे हे आम्ही तुम्हाला आधी सांगितलंच आहे. लक्षात नसेल तर पुन्हा वाचा.

तर मित्रांनो, याला म्हणतात ऑप्टिमाइजेशन. म्हणजे फ़र्टिलाइज़र च्या क्षमतेचा  नेमका आणि पूर्ण सदुपयोग. जमीनितले पोषक तत्व पातळ फ़र्टिलाइज़र आणि आर्गेनिक मैन्युअर च्या मदतीने संतुलित केल्याने पैसे तर वाचतातच, पण शेतीचं उत्पन्न आणि मिळकत सुद्धा वाढते. 

तुम्हाला आमच्या ब्लॉग ची मदत होते आहे की नाही? खाली कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. 

आणि हो, तुमच्यासाठीच बनवलेला यूनिकिसान ऐप डाउनलोड करायला विसरू नका.


Comments

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?