उत्तम पिकांसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
नमस्कार मित्रांनो.
शेतकरी हा सुद्धा एक योद्धाच असतो. पीक लावताना जमीन पूर्णपणे तयार असावी यासाठी त्याला जमीनीची सतत काळजी घ्यावी लागते. पेरणी झालयावर एक नवीन युद्ध सुरू होतं. ह्या पेरलेल्या बिया अंकुरित होतात, त्यांची मुळं मजबूत होतात, आणि मग घसघशीत पीक तयार होतं.
आता पिकांच्या ह्या संपूर्ण चक्रात, काही गोष्टीं आवश्यक आहेत, ज्यामुळे आपल्याला उत्तम पिक मिळेल. बघूया ते कोणते आवश्यक घटक आहेत.
तर मुख्य आहेत नाइट्रोजन, फॉस्फोरस, पोटैश आणि ऑर्गनिक कार्बन. या शिवाय दूसर घटक आहेत, जिंक, आयरन, मैग्नीज़ीअम, कॉपर, सल्फर।
आधी पाहूया नायट्रोजन - नाइट्रोजन पिकांचं क्लोरोफिल तयार करण्यात मदत करतं, जे सूर्यप्रकाशचा वापर करून पिकांना तंतुदार आणि मजबूत करतं. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि पीक पण भरपूर होतं.
फॉस्फोरस
हे पेरलेलल्या बियांना लवकर अंकुरित व्हायला मदत करतं, तसंच हे रोपट्याचे मूळ मजबूत करतं. आणि चांगलं पिक येण्यासाठी हे दोन्ही किती आवश्यक आहेत हे तुम्हाला माहीत आहेच.
पोटैश
हा आणखीन एक महत्वाचा घटक आहे. तुमच्या शेतातल्या रोपट्यांचा आकार, लंबी, रंग, आणि रोगप्रतिकारक क्षमता या पोटाश वर अवलंबून आहेत. म्हणजे पिकात किती मात्रेत पोटॅश आहे यावरून पिकाची गुणवत्ता ठरते.
ऑर्गैनिक कार्बन
शेतात ऑर्गैनिक कार्बन यासाठी गरजेचं आहे की मातीला सुपिक बनवणारे सूक्ष्मजीव किती आहेत हे यावरू कळतं. म्हणजेच हे पिकांच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त आहे.
यांशीवर जे इतर दुय्यम घटक आहेत -- जिंक, आयरन, मैग्नीज़ीअम, कॉपर, सल्फर – ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. रोपं सूर्याच्या प्रकाशापासून स्वतःचं पोषण करतात. हे पाच घटक असतील तर सूर्याप्रकाशापासून होणारं हे पोषण आणखीन चांगलं होईल.
तुमच्या शेतीत उत्तम दर्जाचं भरभरून पीक निघावं यासाठी आम्ही तुम्हाला असेच छोटे छोटे पण सोपे नुसखे संगत राहू. तुम्हाला चांगलं पीक मिळेल. आणि शेती या व्यवसाया बद्दल तुम्हाला निराशा येणार नाही. उलट तुमचं शेतीवर प्रेम वाढत जाईल.
आणि ही माहिती तुमच्यासाठी आम्ही अगदी विनामूल्य देऊ. शेतीविषयी अशा सतत माहितीसाठी युनिककिसान द्वारे आम्हाला भेटत रहा.
युनिकीसान ला फॉलो करत रहा.
https://unikisan.com/
Comments
Post a Comment