ऑर्गनिक पोटाश फर्टिलाइज़रचं महत्व काय?

 नमस्कार मित्रांनो,

आज आम्ही तुम्हाला एका विशेष खतबद्दल – ऑर्गेनिक पोटाश बद्दल सांगणार आहोत. पोटाश हे आपल्या पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण याने पिकांचा आकार, रंग, आणि गुणवत्ता सुधारते. शिवाय, पोटाश हे पिकांना रोगांशी लढण्याची शक्ति देतं.

बहुतेक शेतकरी Muriate of Potash (MOP) म्यूरीएट ऑफ पोटाश(एमओपी) नावाचं’ रासायनिक खत वापरतात, ज्यात 60% पोटाश असते. पण बरेचदा रोपट्यांना इतक्या प्रमाणात पोटाश ची गरज नसते. मग ते अतिरिक्त पोटाश मातीत पडून राहतं.

जर तुम्हाला सॉइल टेस्ट मध्ये लक्षात आलं की तुमच्या मातीत आधीपासून पोटाश आहे, तर तुमच्या जमिनीला एमओपी (MOP) ची सध्या गरज नाहीये। त्या जागी केएमबी (KMB) सारखं पोटाश मोबिलाइजिंग बैक्टीरिया घेऊन ते ऑर्गैनिक मॅन्यूर मध्ये मिसळून मातीत टाका. त्याने जमिनीत जमा असलेलं पोटाश रोपट्यांना मिळेल. गरज वाटल्यास एखादे वेळेस हे मिश्रण रोपट्यांना फुलं आल्यावर ही शिंपडता येईल. 

आणि जर तुमच्या जमिनीत पोटाशची कमी असेल तर ऑर्गेनिक पोटाश वापरता येईल. ऑर्गॅनिक पोटाश हे दाणेदार असतं. पेरणीच्या वेळेस ते ऑर्गॅनिक मॅन्यूअरमध्ये मिसळून जमिनीत टाकावे. यामुळे रोपट्यांना आवश्यक ते पोटाश मिळेल, आणि पिकांची गुणवत्ता देखिल वाढेल.

बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारचे  ऑर्गेनिक पोटाश उपलब्ध आहेत :

- PDM (पीडीएम - पोटाश डिराइवड फ्रॉम मोलासेस): यात 14.5% पोटाश असतं.

- PDR (पीडिआर - पोटाश डिराइवड फ्रॉम रेडोफ़ाईटस): यात 20% पोटाश असतं.

हे दोन्ही पटकन पाण्यात मिसळतात, त्यामुळे रोपट्यांना चांगलं पोषण देऊ शकतात.

या पद्धतीने, जमिनीत पोटाश कमतरता असेल तर हे दाणेदार ऑर्गेनिक पोटाश वापरावे. आणि जमिनीत पोटाश जास्त असेल पोटाश मोबीलाईज़िंग बैक्टीरीया चा वापर करावा. 

मित्रांनो, जर तुम्ही या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या शेतातल्या पिकाची गुणवत्ता आणि जमीनीचं आरोग्य दोन्ही चांगलं राहील. 

आपल्याला ह्या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर #Unikisan ब्लॉग वाचत रहा आणि फॉलो करता रहा. Unikisan ऐप आजच डाउनलोड करा. मग तुम्ही शेतात असा किंवा घरी, ही सर्व माहिती तुम्हाला सहज पाहता येईल.

Comments

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?