ऑर्गनिक फॉस्फेट फर्टिलाइज़र चे महत्व

 कसे आहात मित्रांनो ?

आपलं पुढचा विषय आहे –

ऑर्गनिक फॉस्फेट फर्टिलाइज़र। 

मी आधी संगीतल्याप्रमाणे एक खत म्हणजे मॅन्यूर, जे जमिनीची सुपीकता वाढवते. आणि एक खत म्हणजे फर्टिलाइज़र, जे रोपांची वाढ करण्यात मदत करतं.

ऑर्गैनिक मॅन्यूर बद्दल आपण आधीच बोललोय. आता बघूया ऑर्गनिक फॉस्फेट फर्टिलाइज़र बद्दल, जे मुख्यतः पेरणी च्या वेळी वापरलं पाहिजे.

फर्टिलाइज़र चं मुख्य तत्व ‘फॉसफोरस’ हे कणखर मुळं निर्माण करतं. भारतातील बहुतांश शेतकरी गेल्या 30-40 वर्षांपासून (DAP) डीएपी केमिकल फॉस्फेट फर्टिलाइज़र वापरत आहेत. डीएपी मध्ये 46% फॉसफोरस असतं, 18% नाईट्रोजन, आणि 0% पोटाश असतं.

  जेव्हा शेतकरी हे डीएपी शेतात टाकतात, तेव्हा पिकं किंवा रोपं फक्त 25-30% फॉस्फरस घेतात. उर्वरित फॉस्फरस जमिनीत किंवा मातीत पडून राहतं, त्याचा वापरच होत नाही. आता हे फॉसफोरस आपले शेतकरी मित्र वर्षानुवर्षे टाकताहेत. त्यामुळे मातीत ते खूप प्रमाणात जमा झालंय. आणि मातीच्या किंवा शेतीच्या कामातही येत नाही.

अशा परिस्थितीत आपण आणखी फॉस्फेट खत घातलं तर त्याचा फायदा होणार नाही. कारण त्यात आधीच आवश्यकतेपेक्षा जास्त फॉस्फरस आहे. म्हणूनच आधी सॉइल टेस्ट म्हणजे मातीचं परीक्षण करून हे पाहावं लागेल की जमिनीत फॉस्फरसचे प्रमाण किती आहे, ज्याने रोपांना पुरेसं पोषण मिळू शकेल. जर फॉस्फरस जास्त असेल तर फॉस्फेट खत टाकून फायदा होणार नाही.

यावेळी जमिनीला बॅक्टेरियाची गरज असते, जे फॉसफोरस सोलूबलाइजिंग बैक्टीरीया (PSB/ पीएसबी) च्या स्वरूपात बाजारात मिळतं. हे बैक्टीरीया किंवा जिवाणू जमिनीत साठवलेले अतिरिक्त फॉस्फरस जमिनीत चांगले मिसळतात, ज्याने रोपांना मातीतल्या फॉस्फरसचं पोषण नीट मिळतं.


यासोबतच माइकोराईजा ( Mycorrhizae) नावाचा पदार्थ जमिनीत टाकावा, ज्यामुळे झाडांमध्ये पांढरी मुळे तयार होण्यास मदत होते. फॉसफोरस सोलूबलाइजिंग बैक्टीरीया (PSB/पीएसबी) आणि माइकोराईजा (Mycorrhizae) हे दोन्ही पातळ स्वरूपात एक एक लीटर घ्या आणि 50 किलो ऑर्गैनिक मॅन्यूर मध्ये नीट मिसळून घ्या. हे मिश्रण पेरणी च्या वेळी आपल्या शेतात घाला. एवढा डोज एक एकर जमीनीला पुरेसा आहे. याने आपल्याला पिकांमध्ये चांगलाच फरक दिसून येईल.


या मिश्रणाचा वापर तोपर्यंत करत रहा जोपर्यंत तुमच्या शेतात जमिनीत अतिरिक्त फॉस्फरस आहे. जमिनीत अतिरिक्त फॉस्फरस आहे किंवा नाही हे आपल्याला सॉइल टेस्ट रीपोर्ट मधून कळत राहील. 

याउलट सॉइल टेस्ट मध्ये आपल्या मातीत फॉसफोरस कमी असल्याचं आढळून आलं तर शेतामध्ये “फॉसफेट रिच ऑर्गैनिक मॅन्यूर” (PROM) चे 50 किलो च्या 2 बॅग (जवळ जवळ 100 किलो) घाला। एवढा डोज एक एकर जमीनीसाठी पुरेसा आहे.


 हेच प्रॉम (PROM) फर्टिलाइजर 50 किलो ऑर्गैनिक मॅन्यूर मध्ये मिसळून शेतात टाकलं तर त्याचा पिकांना आणखीनच फायदा होईल.

आता या प्रॉम मध्ये नेमकं असतं काय? तर यात 10-11% फॉसफोरस, 0.5-1% नाईट्रोजन, आणि 0% पोटाश असतं। आणि हे सगळे पदार्थ यात ऑर्गैनिक स्वरूपात असतात त्यामुळे ते रोपांना पूर्णपणे मिळतात. याशिवाय PROM मध्ये सूक्ष्म प्रमाणात जिंक, कॉपर, क्रोमियम, कॅडमियम, निकेल, इत्यादी तत्व पण असतात, जे रोपांना पोषण देतात. हे सगळे सूक्ष्म तत्व आपल्याला DAP मध्ये मिळत नाहीत.

बाजारात जे प्रॉम फर्टिलाइजर उपलब्ध आहेत ते म्हणजे –

1. फॉसफेट रिच ऑर्गैनिक मॅन्यूर (PROM)

2. भू-ग्रो 

3. प्रोमोसा (PROMOSA), इत्यादी।

 मित्रांनो, अशाप्रकारे आपण थोडं विचारपूर्वक आणि शहाणपणाने शेती केली तर रासायनिक खतांचा वापर हळू हळू कमी करत ऑर्गैनिक खतांकडे आपण जाऊ शकतो.  आणि हे करत असताना आपल्या जमिनीत ऑर्गैनिक कार्बन सुद्धा संतुलित राहील. याने आपल्या शेतातील माती आणि पीक दोन्ही ही सशक्त होत जातील.

ही सगळी माहिती Unikisan App वर विस्ताराने दिलेली आहे. आणि ही सगळी माहिती शेतकऱ्यांसाठी Unikisan App वर अगदी मोफत आहेत. म्हणूनच Unikisan App आजच डाउनलोड करा आणि वर्षानुवर्षे स्वस्थ पीक मिळवा.

https://unikisan.com/

Comments

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?