ऑर्गनिक नाइट्रोजन फर्टिलाइज़र चे महत्व

 नमस्कार शेतकरी बंधूंनो,

आपले स्वागत आहे #Unikisan ब्लॉगमध्ये! आज आपण आणखी एका महत्त्वाच्या  विषयावर चर्चा करत आहोत- तो आहे "ऑर्गनिक नाइट्रोजन फर्टिलाइजर्स". 

फर्टिलाइझर्समध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे केमिकल खत म्हणजे यूरिया, ज्यामध्ये जवळजवळ 46.6% नाइट्रोजन आहे, आणि दुसरं खत म्हणजे अमोनियम सल्फेट, ज्यामध्ये जवळजवळ 21% नाइट्रोजन आहे. हे दोन्ही केमिकल फर्टिलाइझर्स पिकांच्या वाढीत मदत करतात, आणि मुख्यत: सिंचन क्षेत्रात वापरले जातात.

यूरियाच्या जागी वापरण्याचं ऑर्गेनिक फर्टिलाइझर शोधणं कठिण आहे. त्यासाठी, आपल्याला हळू हळू नाइट्रोजन फिक्सिंग बॅक्टीरियाचा वापर करावा लागेल, जे वायुमंडलातून नाइट्रोजन मातीत खेचून आणतात. हे रोपट्यांना वाढ चांगली होण्यात मदत करते. या पद्धतीने आपल्याला शेतात यूरिया चा उपयोग कमी करण्यासाठी मदत होईल, आणि आपल्या पिकांचं आरोग्य सुद्धा राखलं जाईल.

नाइट्रोजन फिक्सिंग बॅक्टीरिया चे काही प्रकार बाजारात उपलब्ध आहे. जसे की:

- बायो एनपीके (Bio-NPK)

- एजेटोबॅक्टर (Azotobacter)

- एजोस्पिरिलियम (Azospirillum) इत्यादी.


ह्या बॅक्टीरियाचा डोज - 0.5 ते 1 लीटर प्रति एकर असावा. पेरणी करताना, हे बॅक्टीरिया आर्गेनिक मॅन्युअरमध्ये मिसळून, शेतात घालायचे. पहिल्या सिंचनाच्या वेळी हे स्प्रे टॅंकमध्ये 20 लीटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावे म्हणजे ते रोपट्यांच्या मुळापर्यंत पोचेल. तुम्ही दुसऱ्यांदा सिंचन करणार असाल तर तेव्हा सुद्धा हे आर्गेनिक मॅन्युअरमध्ये मिसळून, शेतात घालायचे.


नाइट्रोजन फिक्सिंग बॅक्टीरियाचा वापर यूरिया टाकण्याच्या 48 तासांपूर्वी किंवा 48 तासांनंतर करावी. प्रत्येक सिंचन चक्रात, यूरियाचा डोझ 50% कमी करावा.

या प्रकारे, आपल्याला शेतीत यूरियाचा उपयोग कमी करताना, नाइट्रोजन फिक्सिंग बॅक्टीरियाचा वापर करून, नाइट्रोजनची कमतरता भरून काढण्यात मदत करता येईल. हे रोपट्याच्या वाढीसाठी उत्तम आहे. आपल्याला ह्या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर #Unikisan ब्लॉग वाचत रहा आणि फॉलो करता रहा. Unikisan ऐप आजच डाउनलोड करा. मग तुम्ही शेतात असा किंवा घरी, ही सर्व माहिती तुम्हाला सहज पाहता येईल. 


Comments

Popular posts from this blog

कम पानी में अच्छी खेती कैसे करें?

सल्फर का पौधों के विकास में क्या महत्व है?

मिट्टी की जाँच के लिए सॉइल सैंपल कैसे निकालें?