ऑर्गनिक पोटाश फर्टिलाइज़रचं महत्व काय?
नमस्कार मित्रांनो , आज आम्ही तुम्हाला एका विशेष खतबद्दल – ऑर्गेनिक पोटाश बद्दल सांगणार आहोत. पोटाश हे आपल्या पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण याने पिकांचा आकार, रंग, आणि गुणवत्ता सुधारते. शिवाय, पोटाश हे पिकांना रोगांशी लढण्याची शक्ति देतं. बहुतेक शेतकरी Muriate of Potash ( MOP ) ‘ म्यूरीएट ऑफ पोटाश ’ (एमओपी) नावाचं’ रासायनिक खत वापरतात , ज्यात 60% पोटाश असते. पण बरेचदा रोपट्यांना इतक्या प्रमाणात पोटाश ची गरज नसते. मग ते अतिरिक्त पोटाश मातीत पडून राहतं. जर तुम्हाला सॉइल टेस्ट मध्ये लक्षात आलं की तुमच्या मातीत आधीपासून पोटाश आहे , तर तुमच्या जमिनीला एमओपी ( MOP ) ची सध्या गरज नाहीये। त्या जागी केएमबी (KMB) सारखं पोटाश मोबिलाइजिंग बैक्टीरिया घेऊन ते ऑर्गैनिक मॅन्यूर मध्ये मिसळून मातीत टाका . त्याने जमिनीत जमा असलेलं पोटाश रोपट्यांना मिळेल. गरज वाटल्यास एखादे वेळेस हे मिश्रण रोपट्यांना फुलं आल्यावर ही शिंपडता येईल. आणि जर तुमच्या जमिनीत पोटाशची कमी असेल तर ऑर्गेनिक पोटाश वापरता येईल. ऑर्गॅनिक पोटाश हे दाणेदार असतं. पेरणीच्या वेळेस ते ऑर्गॅनिक मॅन्यूअरमध्ये मिसळून जमिनीत टाका...